लॉकडाऊनमध्ये घरपोच अस्सल हापूस पोहचवणारा ग्रामीण युवकांचा स्टार्टअप- ऍग्रीवाला.

मागील वर्षी कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी वर्गाला बसला. नेमकी हीच समस्यां हेरून पुण्यातील ऍग्रीवाला हा स्टार्टअप शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन आला.

1

आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा
——————————————————————
कोरोना आणि पाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनने लोकांचे धंदे बंद केले. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने शेतमालाचे दरही कोसळले. मोठा फटका मागील वर्षी कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी वर्गाला बसला. नेमकी हीच समस्यां हेरून पुण्यातील ऍग्रीवाला ही स्टार्टअप कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन आली आणि मागील वर्षी कोकणातील शेकडो शेतकऱ्यांचा हापूस आंबा पुण्यातील ग्राहकांना विकला. त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला.

आता या वर्षी देखील पुन्हा लॉकडाऊन ची परिस्थिती तयार होताना पाहून, मार्चपासूनच ऍग्रीवाला ने पुणे शहर व परिसरात घरपोच अस्सल देवगड हापूसची पेटी पाठविण्यास सुरवात केली. आणि पुणेकर त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत आहेत.

स्वतः ‘टॉक्सिकोलॉजिस्ट’ (विषतज्ञ) असणारे ऍग्रीवालाचे संस्थापक डॉ नरेश शेजवळ यांनी आम्हाला याबाबत प्रतिक्रिया दिली.
“मार्केट मध्ये होणारी मालाची असुरक्षित हाताळणी आणि आंबा चटकन पिकविण्यासाठी होणारा कार्बाइडचा अनियंत्रित वापर हे आरोग्यासाठी घातक आणि कोरोना काळात काळजीदायक आहे.

त्याचसोबत बऱ्याचदा मार्केटमध्ये नफा कमाविण्याच्या दृष्टीने, दक्षिणेकडील, आंबा आणून ग्राहकांना विकला जातो. मार्केट मध्ये दिवसाला होणाऱ्या प्रचंड आवकेचा हा दुय्यम प्रतीचा हापूस, देवगड- रत्नागिरीच्या नावाने विक्री करून ग्राहकांची फसवणूक होतेच तसेच त्याचा फटका आपल्या कोकणातील हापूस उत्पादकांना बसतो आहे. कारण आपल्या देवगड आणि रत्नागिरी हापूस ला ‘जीआय’ मानांकन आहे. म्हणजेच एक प्रकारचे पेटन्टच म्हणा. या नावाने तुम्ही दुसरा हापूस विकल्याने ‘जीआय’ मानांकनाचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही.”

असे उभारले होम डिलिव्हरी मॉडेल:
याबाबत सुरवातीची तयारी नियोजनबद्ध रित्या केली गेली. तब्बल ८५०० अल्पभूधारक शेतकर्‍यांचे नेटवर्क असलेल्या ऍग्रीवाला फार्मर्स क्लब च्या माध्यमातून ऍग्रीवालाने देवगड तालुक्यातील शेतकऱयांना मालाच्या गुणवत्तेबाबत प्रशिक्षण दिले. तसेच पुण्यामध्ये डिलिव्हरी चॅनेल उभे केले. आणि मार्चमध्ये प्रथमच होम डिलिव्हरीचे काम सुरु झाले. मार्चमध्ये ज्यावेळी हापूस कुठेही नजरेस पडत नव्हता त्यावेळी, ऍग्रीवालाच्या रसदार देवगड हापूसच्या पेट्या लोकांना घरपोच मिळत होत्या. काही ग्राहकांनी अस्सल देवगड हापूस आंब्याची चव प्रथमच चाखतो आहोत अशा प्रतिक्रिया दिल्या. मार्चमध्ये सुरवातीला मगरपट्टा भागात सुरु झालेले होम डिलिव्हरीचे जाळे आता प्रचंड मागणीमुळे संपूर्ण पुण्यात पसरले आहे. थेट ग्राहकविक्रीच्या या उपक्रमामुळे प्रीमियम गुणवत्तेचा आंबा वाजवी दरात मिळतो आहे.

परदेशातून बुकिंग-
मूळचे दादरचे चे पण आता स्विजरलंड मध्ये आयटी इंजिनियर असणारे ‘गणेश काळे ‘ या वर्षात पुण्यात येऊ शकले नव्हते. त्यांनी ऍग्रीवालाच्या या उपक्रमाची फेसबुक वर माहिती पाहिली आणि ऑनलाईन बुकिंग करून हापूसची पेटी त्यांच्या कुटुंबियांना भेट म्हणून पाठवली.

काही व्यावसायिक गिफ्ट देण्यासाठी तर व्यावसायिक संकुले, कार्यालये एकाच वेळी मागणी करून ठोक भावाने आंबा ऑर्डर करत आहेत. मार्केटिंग मध्ये लोकांचा अधिकचा सहभाग होण्यासाठी पार्टटाइम ‘ऍग्रीवाला पार्टनर’ म्हणून संकल्पना राबवली आहे. यात गृहिणी, विद्यार्थी, ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे कर्मचारी देखील, आंबा विक्रीस मदत करत आहेत. ऑनलाईन प्रतिसाद पाहून बेल्जीयम, न्यूझीलंड येथून काही भारतीय नागरिकांनी हापूस मागविला आहे . येत्या काळात निर्यात सुरु करण्याचेही नियोजन केले असल्याबाबत ऍग्रीवालाने माहिती दिली.

व्हाट्सअप वर थेट बुकिंगसाठी लिंक –
https://wa.me/message/S3HDYE2FDWNTF1
किंवा ७०३०७९३९७० या क्रमांकावर आपण घरपोच पेटी मागवू शकता.

डॉ. शेजवळ म्हणतात की, तुम्ही मर्सिडीज बेन्ज कार विका ,किंवा आयफोन विका किंवा हापूस आंबा विका, उत्पादनाचे संपूर्ण ज्ञान घेऊन, बाजारपेठेच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेऊन त्यावर नाविन्यपूर्ण व्यावसायिक मॉडेल तयार केले तर यश नक्की आहे.

नाविन्यपूर्ण कृषिउद्योजकतेसाठी मानांकन-
ऍग्रीवाला ला २०२० मध्ये महाराष्ट्रातील ‘टॉप १००’ स्टार्टअप चे प्रशस्तीपत्र मिळाले. २०२१ मध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडून प्रशिक्षण तर केंद्राच्या ‘RKVY RAFTAAR’ स्टार्टअप ग्रांट प्रोग्राम मध्ये निवड झाली आहे.

लॉकडाऊन ने आपणास जाणीव करून दिली आहे की, शेती हाच शाश्वत व्यवसाय आहे. युवा शेतकऱ्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभेचा वापर करून शेतीतून समृद्धीकडे जाणारी वाट शोधावी ऍग्रीवाला च्या उदाहरणावरून हे नक्कीच शिकता येईल.
——————————————————————
आमचे इतर लेख वाचण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा

1 Comment
  1. Antwan says

    Hi! I could have sworn I’ve been to this blog before but after reading through some of
    the post I realized it’s new to me. Anyhow, I’m
    definitely happy I found it and I’ll be book-marking
    and checking back often!

Leave A Reply

Your email address will not be published.